लेखक ‘कै.मो.रा.वाळंबे’ यांचा जीवन परिचय
नितीन प्रकाशनच्या ‘ सुगम मराठी व्याकरण – लेखन ’ या पुस्तकाचे लेखक ‘कै.मो.रा.वाळंबे’ यांचा जीवन परिचय. कै.मो.रा.वाळंबे – जन्म 30 जून, 1912 (रामदुर्ग-कर्नाटक) बी.ए.बी.टी. – मृत्यू 12 मार्च, 1992 (पुणे-महाराष्ट्र) मराठी व्याकरणकार, साहित्यिक विद्यार्थीप्रिय शिक्षक, शिस्तप्रिय व उत्कृष्ट मुख्याध्यापक, विविध विषयावरील लेखन, स्तंभ लेखक बालपणीच आईचे छत्र हरपिले व वडिलांच्या विमनस्क अवस्थेचे परिणाम म्हणून त्यांचे चुलत बंधूच्या आश्रयाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पण परावलंबित्व त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे मावसभावाबरोबर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले. काही ओळखीच्या कुटुंबाच्या मदतीने वार लावून जेवणाची सोय झाली. त्या दरम्यान अनेकदा उपासही घडले. अशा परिस्थितीतही काही ‘देवमाणसे’ तिथे भेटली. त्यामुळे कळत-नकळत मनावर चांगले संस्कार झाले. त्याच लोकांनी पुढील शिक्षणासाठी मदत केली. ज्या लोकांनी आश्रय दिला त्यांच्या मुलांच्या शिकवण्या करुन इतरही काही मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यातल्या अर्थाजनावर ‘बी.टी.’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यामुळे शिक्ष...