Posts

Showing posts from November, 2022

सखोल अभ्यास व प्रयत्नांनी यशप्राप्ती

Image
  माझे वडील पोलीससेवेत कार्यरत असल्याने शासकीय काम व शासकीय अधिकार याबाबत घरी सतत चर्चा होत असे. मी प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी व्हावे, ही माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्याकडूनच मला खरी प्रेरणा मिळाली. त्यामुळे अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते, याची सविस्तर माहिती मी सतत मिळवत राहिलो. हे ध्येय मी पक्के ठरवले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील रेठरे वारणा हे माझं मूळ गाव. पण वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने बालपण मुंबईला गेल्याने सर्व शिक्षण मुंबईतच झालं. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी व अभ्यासासाठी पुण्यात चांगलं पोषक वातावरण आहे असं कळल्यामुळे मी पुण्यात आलो आणि परीक्षेची तयारी करण्यास सुरवात केली. पण आर्थिक अडचणीमुळे मी पुण्यात कायम स्वरुपी राहू शकलो नाही. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मंत्रालय सहायक व विक्रीकर निरीक्षक या पदासाठी परीक्षा दिली. पण 10 गुणांनी माझी निवड हुकली. मात्र अजून सखोल अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकते, याची खात्री पटली, आत्मविश्वास वाढला. नंतर सतत प्रयत्न करत राहिलो. 2009 ते 2013 ही चार वर्षे अथक प्रयत्न करुन अखेर मी परीक्षा उत्तीर्ण झालो. ...