Posts

Showing posts from April, 2024

नोटेशन पुस्तके लेखक – कै. श्री. चंद्रकांत गंगाधर साने

Image
  माहिती चंद्रकांत गंगाधर साने, हे कै. गंगाधर रामचंद्र साने, मूळ बार्शीचे शेती करणारे, परंतु पुढे BA BT ही पदवी प्राप्त करुन, पुण्यास वास्तव्यास आलेल्या, पुण्यातील गोपाळ हायस्कूल उभारणीत मोठा वाटा, इंग्रजीची नोकरी न करण्याचा निश्चय, अशा कै. गंगाधर सान्यांचे कनिष्ठ चिरंजीव. गंगाधर पंत पगाराच्या पैशातून, हुंडाविरोधी पुस्तके, छ. शिवाजी राजांवरील पुस्तके प्रकाशित करत. लहानपणापासूनच चंद्रकांत साने यांना आणि त्यांचे ज्येष्ठबंधू कै. शरदचंद्र साने यांना संगीताची आवड होती, चंद्रकांत साने संवादिनी आणि शरदचंद्र साने बासरीमध्ये असे दोघेही तरबेज होते. या आवडीमुळेच जुन्या ब्रह्मचारी सिनेमातील ‘यमुनाजळी खेळू खेळ कनैया’ या गाण्याची चाळ व सुरुवातीचे संगीत (music) पाठ करण्यासाठी ते ‘प्रभात’ थिएटर मागे १६ वेळा उभे राहून ते गाणे आणि त्यातील संगीत पाठ केले व घरी आल्यावर त्याचे नोटेशन काढले, तेही लहानवयात. अशी संगीताची गोडी उपजत होती. अशा ह्या गानवेड्या रसिकाला मॅट्रिक झाल्यावर सरकारी खात्यात, DIC (District Industrial Centre) मध्ये नोकरी मिळाली. त्यांची पत्नी कै. विजयाताई साने यांनी वेळप्रसंगी आपले दागि...