Gata Rahe Mera Dil
आपल्यापैकी प्रत्येकजण तानसेन असेलच, असं खात्रीने सांगता येत नाही पण, आपल्या आजूबाजूला अनेक ‘कानसेन’ मात्र आपल्याला नक्कीच सापडतात. अहो बाकीच्यांचं कशाला, आपण स्वतः देखील दिवसभरात एकदातरी एखादी ओळ गुणगुणत असतोच की! अशाच – ‘मला थोडं मार्गदर्शन मिळालं ना, मी अजून छान गाऊ शकेन!’ असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी नितीन प्रकाशन गेली अनेक वर्षे सातत्याने काम करत आहे. मग ते ‘गाता रहे मेरा दिल!’ हा हिंदी गाण्यांच्या नोटेशन्सचा संग्रह असो किंवा तबल्याची, संवादिनीची (हार्मोनियम) प्रकाशित केलेली अनेक पुस्तकं असतील. स्वतःमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या, त्यावर काम करायची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ही सगळी पुस्तक गुरु द्रोणाचार्यांसारखी मदतीला येतात. संगीत ही एक साधना आहे. भारत देशाला संस्कृती सोबतच संगीताचासुद्धा एक मोठा इतिहास लाभला आहे. भारतीय संगीतामध्ये अगदी शास्त्रीय संगीतापासून ते तोडी, धमार, होरी, ख्याल, टप्पा, चतुरंग, रससागर, तराना, सरगम ते अगदी ठुमरी, गझलपर्यंत न संपणारी यादी आहे. फक्त १२ सूरांचं साम्राज, आणि हे अगदी सहज आणि सोपे वाटणारे सूर गळ्यातून चपखल बाहेर पडण्यासाठी एक एक...