Gata Rahe Mera Dil

 

आपल्यापैकी प्रत्येकजण तानसेन असेलच, असं खात्रीने सांगता येत नाही पण, आपल्या आजूबाजूला अनेक ‘कानसेन’ मात्र आपल्याला नक्कीच सापडतात. अहो बाकीच्यांचं कशाला, आपण स्वतः देखील दिवसभरात एकदातरी एखादी ओळ गुणगुणत असतोच की!

अशाच – ‘मला थोडं मार्गदर्शन मिळालं ना, मी अजून छान गाऊ शकेन!’ असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी नितीन प्रकाशन गेली अनेक वर्षे सातत्याने काम करत आहे. मग ते ‘गाता रहे मेरा दिल!’ हा हिंदी गाण्यांच्या नोटेशन्सचा संग्रह असो किंवा तबल्याची, संवादिनीची (हार्मोनियम) प्रकाशित केलेली अनेक पुस्तकं असतील. स्वतःमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या, त्यावर काम करायची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ही सगळी पुस्तक गुरु द्रोणाचार्यांसारखी मदतीला येतात.

संगीत ही एक साधना आहे. भारत देशाला संस्कृती सोबतच संगीताचासुद्धा एक मोठा इतिहास लाभला आहे. भारतीय संगीतामध्ये अगदी शास्त्रीय संगीतापासून ते तोडी, धमार, होरी, ख्याल, टप्पा, चतुरंग, रससागर, तराना, सरगम ते अगदी ठुमरी, गझलपर्यंत न संपणारी यादी आहे. फक्त १२ सूरांचं साम्राज, आणि हे अगदी सहज आणि सोपे वाटणारे सूर गळ्यातून चपखल बाहेर पडण्यासाठी एक एक गायक खूप मोठी साधना करत असतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच तेवढा वेळ देणं शक्य होतच असं नाही, आणि मग अत्यंत जवळचा असा हा छंद मागे पडत जातो. पण ह्या सगळ्यात एखादं संगीताचं योग्य मार्गदर्शन करणारं पुस्तक आपल्याजवळ असेल, तर आपल्याला हव्या त्या वेळी, सगळे व्याप सांभाळून आपला रियाज नित्यनेमाने करू शकतो. ना कुठली वयोमर्यादा! ना कुठलीही शैक्षणिक पात्रतेची अट! सातत्याने सराव करणाऱ्या प्रत्येकाला ह्या सर्व पुस्तकांचा ते दैवी १२ सूर गवसण्यासाठी मदत होईल एवढं नक्की!

ह्यातली अनेक पुस्तक, आणि त्यातली माहिती ही हिंदी आणि मराठी अशा दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. अनेक पुस्तकांमध्ये, अत्यंत सहज गुणगुणता येतील अशी गाणी, थोडी सरावानी बसणारी गाणी आणि ऐकायला अत्यंत सुंदर पण म्हणायला अवघड अशा तीन भागांमध्ये गाण्यांची रचना केलेली आहे. त्यामुळे अगदी नुकतंच गुणगुणू लागलेल्या रसिकांपासून ते बरीच समज आलेल्या विद्यार्थी गायकालासुद्धा ह्या सरावाची आवड निर्माण होईल आणि मग त्यातलं सातत्य वाढत जाईल.

ह्या नोट्सशन्सच्या संग्रहामध्ये अनेक प्रसिद्ध भावगीते, भक्तिगीते, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत अशा गायन प्रकारांचा त्याच बरोबर, सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, किशोर कुमार, रफी साहेब अशा मराठी आणि हिंदी कला क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतील.

नितीन प्रकाशनच्या ह्या कष्टांचा फायदा अनेक होतकरू गायक आणि संगीतकारांना होतो आहे आणि ह्यापुढेही होत राहणार आहे. अनेक होतकरू गायकांना आणि संगीतकारांना आपल्या मधल्या सुप्त कलेचा अविष्कार होऊन त्यांना सातत्याने त्यावर काम करण्यासाठी आवश्यक असणारी मदत ह्या पुस्तकांमधून झाली असल्याच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ‘गुणगुणण्यापासून ते -गाण्यापर्यंत’ चा प्रवास योग्य आणि अर्थपूर्ण पद्धतीने पुढे नेऊ शकता. आजच आपली प्रत बुक करा आणि ह्या सांगीतिक प्रवासाला सुरवात करा.

Comments

Popular posts from this blog

Mo Ra Walambe Book | Updates Free PDF Download | सुगम मराठी व्याकरण व लेखन

लेखक ‘कै.मो.रा.वाळंबे’ यांचा जीवन परिचय

MPSC Combine Group B & C Exam 2023 Test Series By MPSC Mitra